Ad will apear here
Next
जत्रेमुळे ‘पुस्तकांचं गाव’ प्रकल्प तात्पुरता बंद
मुंबई : ‘पुस्तकांचं गाव, भिलार येथे गावची जत्रा असल्याने, १३ ते १५ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत ‘पुस्तकांचं गाव’ हा प्रकल्प तात्पुरता बंद राहणार आहे,’ अशी माहिती राज्य मराठी विकास संस्थेच्या संचालकांनी दिली आहे.

या काळात भिलार गावात अनेक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत. मूळ गाव भिलार असलेले देशभरातील भिलारवासीय जत्रेच्या निमित्ताने गावास भेट देणार आहेत. त्यामुळे गावातील घरे (वाचनालये) पर्यटकांना आणि शालेय व महाविद्यालयीन सहलींना वाचनाची व पर्यटनाची सेवा देऊ शकणार नाहीत.

या पार्श्वभूमीवर पर्यटकांनी सहकार्य करावे, अशी विनंती भिलार ग्रामपंचायत व पुस्तकांचं गाव प्रकल्पाच्या कार्यालयाच्या वतीने करण्यात आली आहे. 

(भिलार या गावाबद्दल अधिक माहिती देणारे ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील लेख वाचण्यासाठी https://goo.gl/HsT5n7 या लिंकवर क्लिक करा.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZSVBX
 Visited on World Pustak Din. D
Surprised to see no glamour of event by Village as well by Govt. Office. This Govt. Office has no proper board on the Building easily visible to visitors. Even Officer refused to use Washroom for Senior Citizen like me. How one can pass time in that Office without washroom ? Reading in library is possed as new concept, where as most of the libraries allow reading. Inconvenient for families having different reading habits. They have to seat for reading at different places. Specially for children. It would have been only One Big Complex under one roof having facility to.open different services by local residents. One can just have a glance and decide to purchase same, said facility is not available which will boost sell of Books may be via online. Seems said project is not implemented by taking advise of concerned persons. In my opinion it has boosted only tourism in Bhilar by which locals have stated earning
Similar Posts
पुस्तकांच्या गावात दिवाळी अंक प्रदर्शन पुणे : दिवाळी अंक हा मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय. ‘मनोरंजन’ हा मराठीतील पहिला दिवाळी अंक १९०९मध्ये प्रकाशित झाला. तेव्हापासून २०१७पर्यंतचे सर्व दिवाळी अंक एकाच ठिकाणी पाहायला आणि वाचायला मिळण्यासाठी महाबळेश्वरजवळच्या भिलार या पुस्तकांच्या गावात दिवाळी अंक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
वैभवशाली साताऱ्याची सफर - १० ‘करू या देशाटन’ सदराच्या गेल्या नऊ भागांत आपण वैभवशाली साताऱ्याची सफर केली. त्या मालिकेतील आजच्या दहाव्या भागात माहिती घेऊ या महाराष्ट्राचे नंदनवन समजले जाणारे महाबळेश्वर आणि पाचगणी या दोन निसर्गरम्य अशा थंड हवेच्या ठिकाणांची.
महाबळेश्वर गारठले; वेण्णा तलाव परिसरात धुक्याची चादर महाबळेश्‍वर : गेल्या दोन दिवसांपासून महाबळेश्वरमध्ये थंडीचा जोर वाढत चालला आहे. प्रसिद्ध वेण्णा तलाव परिसरात तर थंडी अधिकच जाणवत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह पर्यटक दिवसभर गरम कपडे, शाली, स्वेटर्स, वूलनचे कपडे घालून फिरताना दिसत आहेत.
पुस्तकांच्या गावाचा होणार विस्तार पुणे : ‘महाबळेश्वरजवळ असलेले ‘भिलार’ हे पुस्तकांचे गाव आता अधिक मोठे होणार आहे. या पुस्तकाच्या गावाला दोन वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने इथे आणखी पाच नवी दालने सुरू करण्यात येणार असून, याद्वारे पाच ते सहा हजार नवी पुस्तके भिलारमध्ये वाचकांसाठी उपलब्ध केली जाणार आहेत. पुस्तकांच्या गावाच्या वर्धापनदिनी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language